ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 20 - शरीरावर होणा-या वेगवेगळया शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया सर्वात जटील समजली जाते. रुग्णाला बेशुद्ध करुन डॉक्टर ही शस्त्रक्रिया करतात. पण बंगळुरुच्या एका रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये मेंदूवर शस्त्रक्रिया चालू असताना 32 वर्षांचा तरुण संगीतकार गिटारच्या तारा छेडून डॉक्टरांना मदत करत होता. म्यूझिशियन डायस्टोनिया या दूर्धर न्युरोलॉजिकल डिसऑर्डरने हा तरुण आजारी होता.
या शस्त्रक्रियेव्दारे मेंदूतील काही विशिष्ट भाग जाळण्यात येतात. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार तब्बल सात तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. या दरम्यान हा तरुण गिटारच्या तारा छेडून नेमकी कुठे समस्या आहे ते डॉक्टरांना दाखवत होता. दीडवर्षांपूर्वी गिटार वाजवत असताना त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे व्यवस्थित काम करत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. म्यूझिशियन डायस्टोनिया या आजारामध्ये आपोआप स्नायू आकुंचन पावतात.
मेंदूकडून स्नायूंना चुकीचा संदेश दिल्यामुळे हा आजार होऊ शकतो. या आजारात मान, डोळे, आवाज आणि हातावर परिणाम होऊ शकतो. म्यूझिशयन्समध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते. हा तरुण जेव्हा गिटार वाजवायला जायचा त्यावेळी त्याची डाव्या हातीची बोटे बरोबर चालत नव्हती. ऑपरेशन टेबलवर गिटारच्या तारा छेडून हा तरुण नेमकी मेंदूच्या कुठल्या भागात अडचण आहे ते डॉक्टरांना सांगत होता.
आणखी वाचा
या शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक कंपने निर्माण करणारे मेंदूतील भाग जाळून नष्ट करण्यात येतात. संबंधित तरुण आता या आजारातून पूर्ण बरा झाला असून, ऑपरेशन टेबलवरच जणू काही जादू झाली आणि माझी बोटे पूर्वी सारखी गिटारवरुन फिरु लागली असे या तरुणाने सांगितले. आता हा तरुण पुन्हा गिटार वाजण्यासाठी सज्ज झाला आहे.
महिला वेगवान
वैज्ञानिक पातळीवर वस्तुस्थिती अशी आहे की, महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत छोटा आहे; परंतु मेंदू छोटा असूनही महिला पुरुषांबरोबर किंवा कधी-कधी त्यांच्यापेक्षाही जास्त चांगले काम करतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू १४ टक्के लहान असतो. छोट्या मेंदूबद्दल वैज्ञानिकांचे म्हणणे असे आहे की, पुरुषांकडे ब्रेन सेल्सची संख्या जास्त आहे, तर महिलांकडे ब्रेन सेल्सची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी आहे.