नेपाळमधून उड्डाण केलेल्या प्रवासी विमानालाआग लागल्याची मोठी घटना घडली आहे. यामुळे जवळपास १६९ प्रवाशांचा जीव धोक्यात होता. वैमानिक काठमांडूमध्ये विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान बोईंग ७३७ चे हे विमान असून दिल्लीच्या दिशेने हे विमान पुढे जात आहे. हे विमान सुखरुप असून दुबईला निघाल्याचे नेपाळच्या मंत्र्यांनी सांगितले.
फ्लाय दुबईचे हे विमान असून विमानाच्या एका इंजिनाला हवेत आग लागली होती. सध्या हे विमान ३४ हजार फुटांवर आहे. विमानाला आगीने आणखी वेढू नये म्हणून वैमानिक आतील इंधन टाकत होता. विमानात १२० नेपाळचे प्रवासी आणि ४९ परदेशातले नागरिक असल्याचे समजत आहे.
काठमांडूच्या विमानतळावर विमान लँड करण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतू आता हे विमान दिल्ली एटीसी जवळ असून दुबईकडे जाताना दिसत आहे. बरेलीच्या आकाशातून हे विमान पुढे गेले आहे.