शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Breaking: भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारला अपघात

By बाळकृष्ण परब | Published: December 30, 2020 4:30 PM

Accident News : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या काराल आज राजस्थानमध्ये मोठा अपघात झाला. लालसोट-कोटा महामार्गावर सूरवाल ठाण्याजवळ हा अपघात झाला.

कोटा (राजस्थान) - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या काराल आज राजस्थानमध्ये मोठा अपघात झाला. लालसोट-कोटा महामार्गावर सूरवाल ठाण्याजवळ हा अपघात झाला. सुदैवाने अझरुद्दीन हे या अपघातातून बालंबाल बचावले. मोहम्मद अझरुद्दीन हे कुटुंबीयांसह रणथंबोर येथे येत असताना हा अपघात झाला.भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारचा टायर निघाल्याने कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार रस्त्याशेजारी असलेल्या ढाब्यामध्ये घुसली. या अपघातातून अझरुद्दीन आणि त्यांचे कुटुंबीय बचावले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र ढाब्यावर काम करत असलेला चाळीस वर्षीय युवक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. तर अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अझरुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या कारमधून हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले. तर पोलिसांनीही या अपघाताच्या चौकशीस सुरुवात केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ