नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन महाराष्ट्रात ृ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला आहे. तर, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे, आता देशात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील घोषणा पत्राद्वारे केली आहे. देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यांसदर्भातील शिथितलेबाबत मार्गदर्शन सूचना आणि नियमावली जाहीर करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनपूर्वी देशातील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी, देशावासीयांसाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेजी घोषणा मोदींनी केली. देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढ्या रकमचे जगातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज असल्याचंही मोदींनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. याच भाषणात, मोदींनी देशवासीयांना ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारला विशेष अधिकार दिल्याचं मोदींनी सांगतिलं. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने ३१ मे पर्यंतचा लॉकडाऊन घोषित केला. महाराष्ट्रात कोरोनाबाधिताची संख्या ३० हजारांच्या पार गेली आहे. तर, राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, आता केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेही देशातील लॉकडाऊ ३१ मेपर्यंत वाढविल्याचे सांगितले आहे.