मेकअपची मदत घेऊन काही काळ सुंदर दिसता येते. एका तरुणीच्या सौंदर्यावर भाळून एक जण तिच्या प्रेमातही पडला, परंतु मेकअप न करता बॉयफ्रेंडला भेटणे किती महागात पडू शकते, याचा अनुभव तिला आला. प्रेमात उतावीळ झालेल्या बॉयफ्रेंडने तिला एके दिवशी सरप्राइज द्यायचे ठरवले व तो सकाळीच तिच्या घरी दाखल झाला. मात्र, झाले भलतेच. तिला बिना मेकअपचे पाहून तो स्वत:च घाबरला व त्याच वेळी त्याने ब्रेकअप घेण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्याने तिला दूषणेही दिली. तिचा बिना मेकअपचा चेहरा व मेकअपनंतरचा चेहरा यात एवढा फरक का पडला, असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिकच आहे, तर ही तरुणी एका दुर्मीळ आजाराने बालपणापासून त्रस्त आहे. या आजारात चेहऱ्याची त्वचा फाटते व त्यातून रक्त बाहेर येत राहते. वय वाढले, तसा या आजाराचा त्रासही वाढला. हे झाकण्यासाठी ती दिवसातील अनेक तास खर्च करून मेकअप करते व सुंदर दिसते.
बिना मेकअपचे पाहून ब्रेकअप
By admin | Published: March 02, 2017 4:29 AM