कोलकाता - पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्याता आली आहे. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. सत्यजीत बिश्वास हे कृष्णगंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. नाडीया जिल्ह्यात ही घटना घडली.
सरस्वती मातेची पूजा सुरू असताना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.