नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच जामिया विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना घडली होती. यानंतर अनेक स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. मात्र जामियामधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. जामियाच्या गेट नंबर पाचजवळ काही लोक जबरदस्तीने घुसले आणि घोषणाबाजी सुरू केली असल्याची माहिती आहे.
मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांना जामियाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. देशाच्या गद्दारांना गोळी मारा अशा घोषणा देत लोक जामियामधील आंदोलनस्थळाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी पोलीस वेळेवर पोहचवून या आंदोलनकर्त्यांना लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून जामिया परिसर अत्यंत संवेदनशील परिसर बनला आहे. रविवारी रात्री जामिया मिलिया इस्लामिया येथे गोळीबारची आणखी एक घटना घडली. जामियाच्या गेट नंबर पाचवर गोळीबार झाला. गोळीबार दरम्यान दोन संशयित दिसले. रात्री गोळीबार झाल्याची माहिती मिळताच जामिया मिलिया इस्लामिया बाहेर लोक जमा झाले आणि निषेध सुरू झाला. पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणाले की जामिया नगरच्या एसएचओने घटनास्थळाची माहिती घेतली. या भागातील गोळीबारीची ही तिसरी घटना आहे.
विशेष म्हणजे निषेधाच्या वेळी होणारी हिंसाचार रोखणे दिल्ली पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनलं आहे. शाहीन बागेत विरोधकांना आंदोलनास बसल्यापासून 50 दिवसाहून अधिक दिवस झाले आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर शाहीन बागेत सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनातसोमवारी सायंकाळी या भागात रॅपिड एक्शन फोर्स तैनात करण्यात आली होती. त्याचवेळी सीमा सुरक्षा दलाचे जवानही शाहीन बागेत पोहोचले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून फोर्स तैनात करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसीविरोधात गेल्या 50 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
जोपर्यंत सरकार हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आपला निषेध सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. अलीकडच्या काही दिवसांत येथून गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.