शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

स्तनपानामुळे घटतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 1:33 PM

आईच्या स्तनातून स्रवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषणघटक आई आणि मुलाच्या  आरोग्यासाठी त्याचा होणारा फायदा याची तुलना कशाशीही केली जाऊ शकत नाही.

मुंबई-जागतिक स्तनपान १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट असा साजरा केला जातो.  प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे तिचे स्त्रीत्व पूर्ण करणारे तिचे मातृत्व. मूल जन्माला आल्यानंतर आईने पाजलेले दूध हे तिच्या शिशुसाठी अमृतासमान असते. आईच्या स्तनातून स्रवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषणघटक आई आणि मुलाच्या  आरोग्यासाठी त्याचा होणारा फायदा याची तुलना कशाशीही केली जाऊ शकत नाही.  यासंदर्भात  IVF कन्सल्टंट, डॉ. राजलक्ष्मी वालावलकर यांनी नवजात बालकासाठी व स्तनपान देणाऱ्या मातेसाठी स्तनपान का आवश्यक आहे याची कारणे सांगितली आहेत. स्तनपानाने मिळणारे दूध हे  नक्कीच एक उत्तम पोषणमूल्ये असणारे आहे जे नवजात शिशुला अन्य कोणत्याच बाहेरील दुधातून मिळू शकणार नाही. स्तनपान हे आईच्याआरोग्यासाठी ही लाभदायक आहे. 

स्तनपानाचे मातांना होणारे फायदे 1. स्तनपानामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते: आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माता ही आपल्या नवजात शिशुला पुरेसे स्तनपान करू शकते का हा केवळ प्रश्नच आहे. परंतु ज्या माता स्तनपान करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते . काही स्तनपान करणाऱ्या मातांना  दुग्धपान करताना संप्रेरकातील बदलामुळे (harmonal changes) त्यांच्या मासिक पाळी उशिराने येणं यांसारख्या गोष्टी अनुभवाव्या लागतात. याचा एकंदरीत परिणाम म्हणजे स्त्रियांच्या शरीरातील एस्ट्रॉगन सारख्या संप्रेरकाचीकमतरता निर्माण होते. अंतिमतः स्तनामध्ये  कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यास सुरुवात होते. गर्भधारणेच्या तसेच स्तनपानाच्या काळात  स्तनातील पेशीमध्ये बदल होत असतात. या पेशींमधील बदलामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी होते. 

 2. बाटलीने दूध भरवणाऱ्या मातांच्या तुलनेत स्तनपान करणाऱ्या मातांना कमीत कमी कालावधीत वजन कमी करण्यास तसेच गर्भधारणेआधीची शरीरयष्टी पुन्हा मिळवणे अधिक सोपे होते: गर्भवती मातांचें शरीर हे गर्भधारणेच्या काळात अधिकाधिक चरबी साठवून ठेवत असते कारण  शरीरामध्ये दूध निर्माण होण्याच्या कालावधीमध्ये जास्त कॅलरीज साठवून ठेवण्याची गरज असते. अशा वेळी स्तनपान करणाऱया मातांना त्यांच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अधिक मदत होते याउलट बाटलीने  दूध भरवणाऱ्या मातांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. 

3. स्तनपानाने   आई आणि बाळाचे नाते दृढ होण्यास अधिक मदत होते: स्तनपानावेळी आई आणि बाळामधील अंतर हे सर्वात जवळचे असते. मूल हे आईच्या इतके जवळ असते की ते सहज आपल्या आईच्या हृदयाचे ठोके ओळखू शकते. प्रक्रियेतून बाळामध्ये शांती आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागते. स्तनपानकरताना संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे सुद्धा आई आणि बाळ यांच्या नात्यात दृढता आणणारे ठरतात. ऑक्सिटोसिन हे एक प्रेम वाढवणारे संप्रेरक(love harmone) असून यामुळे स्तनपान करणाऱ्या माता आणि त्यांचे मूल यांच्यामध्ये एक उच्चपातळीचे भावनिक संबंध निर्माण करण्यास मदत करतात.  स्तनपानामुळे बाळांना होणारे फायदे:१)   उत्तम पोषणाचा स्रोत: स्तनपानातून  मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोत्तम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्व, प्रथिने, आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटकांचा योग्य मिलाफ असते. त्यात बरीचप्रतिबंधात्मक द्रव्ये (antibodies) असतात. ज्यामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढीस लागते आणि बाहेरील जंतुसंसर्गांपासून, ऍलर्जी  यांसारख्याना रोगांना प्रतिकार करणे शकय होते. तसेच या दुधामुळे अस्थमा व दमा होण्याची शक्यता फारकमी होते. 

२) स्तनपानामुळे मुलांच्या मेंदूचा व विकास वेळीच झाल्यामुळे बौद्धिक क्षमता ही उंचावते: स्तनपानाचा अर्भकाच्या विकासातील सर्वोत्तम दुवा म्हणजे त्यात असणारे चरबीयुक्त फॅटी अॅसिडची शृंखला जे मेंदूच्या विकासासाठी आणिवाढीसाठी  उपयुक्त असून ते बुद्धिमत्ता गुणक तयार करतात. 

३) स्तनपानामुळे बाळाचा जबडा आणि जीभ यांचा योग्य विकास होतो: स्तनपान करून दूध पाजताना बाळाचा जबडा आणि जीभ यांच्या हालचालींचा योग्य समन्वय असणे आवश्यक असते जे बाळाला बाटलीने दूध पाजताना होणाऱ्या हालचालींपेक्षा कितीतरी वेगळे आहे. बाळाच्या दातांचे आरोग्य आणि वायुमार्गाच्या  योग्य विकासासाठी स्तनपान अधिक महत्वाचे आहे. 

  

टॅग्स :World Breastfeeding Weekजागतिक स्तनपान सप्ताह