बंगळुरू : बंगळुरूचे (दक्षिण) खासदार तेजस्वी सूर्या यांनी कोरोना काळात भाजपचीच सत्ता असलेल्या बंगळुरू महापालिका रुग्णालयात लाच घेऊन कोरोना रुग्णांना बेड दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्याबद्दल त्यांनी महानगर पालिकेलाच जबाबदार धरले आहे.
सूर्या यांच्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणी रोहित आणि नेत्र नावाच्या दोघांना अटक केली आहे. हे दोघे एका बेडसाठी २५ ते ५० हजार रुपयांची लाच घेत होते. पोलिसांनी त्यांच्या खात्यातून १.०५ लाख रुपये जप्त केले. सूर्यांनी आरोप केला आहे की, बीबीएमपी अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बेड देण्यात गैरव्यवहार सुरू आहेत.