शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

भयंकर! नवरी नटली अन् अचानक खाली पडली; हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 5:34 PM

घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सर्वत्र जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण होते. याच दरम्यान, अचानक आनंदावर विरजण पडलं.

गुजरातमधील भावनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सर्वत्र जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण होते. याच दरम्यान, अचानक आनंदावर विरजण पडले. नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भावनगर येथील राणाभाई बुटावई अलगोटार यांचा मुलगा विशाल याच लग्न जिनाभाई राठोड यांची मुलगी हेतल हिच्याशी ठरलं होतं. 

सर्वजण आनंदाने लग्नाची तयारी करत होते. भगवानेश्वर मंदिरासमोर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. घरात पाहुणे आणि नातेवाईकांची ये-जा सुरूच होती. संगीत वाजत होते. थोड्याच वेळात दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार होते. पण कदाचित नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळे ठेवले होते. लग्नाआधी हेतलचं डोकं दुखू लागलं. मोकळ्या हवेत श्वास घेता यावा म्हणून ती टेरेसवर पोहोचली पण तिथून खाली पडली. 

घरातील लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी हेतलचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की, हेतलला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे तिला वाचवता आले नाही. घरात मुलीच्या मृत्यूने शोककळा पसरली होती. यानंतर वधूच्या छोट्या बहिणीशी लग्न करण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही कुटुंबीयांनी अखेर हा निर्णय मान्य केला.

भावनगर शहराचे नगरसेवक व मालधारी समाजाचे नेते लक्ष्मणभाई राठोड म्हणाले की, घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. आपण तिला परत आणू शकत नाही, परंतु दु:ख नक्कीच कमी करू शकतो. त्यामुळे समाजाने एकत्र येऊन हा निर्णय घेतला. समाजाचा विचार करता दोन्ही कुटुंबांनी घालून दिलेला आदर्श खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. लग्नाचे विधी पूर्ण होईपर्यंत हेतलचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न