पंजाबच्या संगरुरमध्ये आपच्या आमदार नरिंदर कौर भराज या आज लग्नबंधनात अडकल्या. महत्वाचे म्हणजे, नरिंदर यांनी आपचाच कार्यकर्ता मनदीप सिंग लक्खेवाल सोबत साध्या पद्धतीने लग्न केले. पटियालाच्या रोडेवालयेथील गुरुद्वारामध्ये त्यांनी सात फेरे घेतले. पती हा त्यांचा शाळेपासूनचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे.
आपने सामान्य कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देऊन आमदार बनविले आहे. यामुळे आम्ही सामान्य कुटुंबातील असल्याने साध्या पद्धतीनेच लग्न केले आहे. असे नरिंदर यांनी म्हटले. राजकीय जबाबदारीनंतर आता कौटुंबीक जबाबदारी देखील वाढली आहे. मला आनंद वाटण्यासाठी एक चांगला साथीदार मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया नरिंदर यांनी दिली आहे.
नरिंदर कौरचे गाव भारज आणि मनदीप सिंहचे लाखेवाल या गावांत फक्त 2 किलोमीटरचे अंतर आहे. मनदीप सिंग हा आपचा कार्यकर्ता असून मीडिया प्रभारीदेखील आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मनदीप सिंग यांने नरिंदरचा प्रचार केला होता. नरिंदर या २८ वर्षांच्या असून त्या पंजाब विधानसभेतील सर्वात कमी वयाच्या आमदार आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संगरूर मतदारसंघातून त्यांनी 38 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती.
नरिंदर यांनी कॅप्टन अमरिंदर यांच्या सरकारचे कॅबिनेट मंत्री विजय इंदर सिंगला यांचा पराभव केला होता. शिरोमणी अकाली दलाचे विनरजीत सिंग गोल्डी आणि भारतीय जनता पक्षाचे अरविंद खन्ना हे देखील यावेळी उभे ठाकले होते. या तिन्ही उमेदवारांना शिकस्त दिली होती.
भगवंत मान यांचीही उपस्थिती२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनिंदर यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी पोलिंग बुथ उभारला होता. जिंकल्यानंतर मान स्वत: तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेले होते. यानंतर मनिंदर यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. आज लग्नसोहळ्याला मान आणि त्यांची पत्नी उपस्थित होते.