शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
3
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
4
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
5
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
6
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
7
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
8
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
9
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
10
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
11
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
12
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
13
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
14
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
15
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
16
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
17
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
18
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
19
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
20
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग

बहिणीचे चुंबने घेतल्याने वधूने लग्नास दिला नकार

By admin | Published: May 29, 2015 1:41 PM

कानपूरमधील लग्नसोहळ्यात सास-याने भर मंडपात वधूच्या बहिणीचे चुंबन घेतल्याने वधूने लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. २९ - कानपूरमधील लग्नसोहळ्यात सास-याने भर मंडपात वधूच्या बहिणीचे चुंबन घेतल्याने वधूने लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वधूच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल न केल्याने चुंबनवीर सास-याची तुरुंगवारी टळली आहे.

फरुखाबाद जिल्ह्यातील  नागला खैरबंद या गावात राहणा-या परमेश्वरी दयाल यांच्या कन्येचा विवाह नेहरुनगर येथील बाबूराम यांचा मुलगा राजेश याच्याशी ठरला होता. लग्नाच्या दिवशी वाजत गाजत वरात लग्नमंडपात दाखल झाली. वधू - वर वरमाला घालण्यासाठी मंचावरही आले. मात्र नेमक्या त्याच वेळी वराच्या वडिलांनी वधूच्या चुलत बहिणीचे सर्वांसमक्ष चुंबन घेतले. हा प्रकार बघून वधू पक्षातील मंडळीचा पारा चढला. वधूनेही चुंबनवीर सास-याला दणका देत लग्न करण्यास नकार दिला. आपली चुक लक्षात वराच्या वडिलांनी त्या मुलीची माफीदेखील मागितली. मात्र वधू तिच्या निर्णयावर ठाम होती. वरपक्षाने लग्नासाठी झालेला खर्च व लग्नात आलेल्या भेटवस्तू परत देण्याची अट घातली. वधूच्या नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा बघून वरपक्षातील मंडळीही नरमली व त्यांनी गपगुमान खर्च, भेटवस्तू सर्व काही परत दिले. याप्रकरणी आमच्याकडे कोणीही तक्रार दाखल केलेली नाही असे पोलिसांनी सांगितले.