उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील राठ पोलीस स्टेशन कोतवालीच्या बसेला गावात राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न झाशी जिल्ह्यातील चिरगाव येथील तरुणीशी गेल्या वर्षी 22 फेब्रुवारीला झाले होते. लग्नानंतर तरुणी प्रियकराशी फोनवर बोलू लागली. तिचा प्रियकर ओराई जालौन येथे राहतो. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतरही महिला प्रियकरासह पळून जाण्यासाठी राठ परिसरात पोहोचली होती आणि हार घेऊन पोलीस ठाण्यात गेली.
महिलेने सीओ आणि प्रभारी निरीक्षकांसमोर आपली अजब मागणी ठेवली. महिलेने आधी सांगितले की तिला तिच्या प्रियकराशी लग्न करायचे आहे. याच दरम्यान, कुटुंबीय घटनास्थळी पोहोचल्याची ती खूप संतापली. तिने कोतवालीत अधिकाऱ्यांसमोर पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली.
पतीसह प्रियकराला सोबत ठेवण्यावर ती ठाम होती. तरुणीच्या गोंधळामुळे पोलीस ठाण्यात काही वेळ गोंधळ होता. कोतवालीत नववधूच्या पोशाखात असलेल्या महिलेला महिला कॉन्स्टेबलने खूप समजावले. पण ती ऐकायला तयार नव्हती. रागाच्या भरात तरुणीने लेडी कॉन्स्टेबलशी बाचाबाची करत तिचा मोबाईल फेकून दिला आणि तोडला.
कुटुंबाने कसा तरी महिलेला शांत केलं. मुलीच्या पतीने सांगितले की, तिने तिच्या प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट केला आहे. आता तिला पतीशिवाय प्रियकरालाही सोबत ठेवायचे आहे. राठ कोतवालीचे प्रभारी निरीक्षक भरत कुमार यांनी सांगितले की, महिला मानसिकरित्या आजारी आहे, तिला सध्या तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.