संक्षिप्त
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM
बस प्रवाशांची अडचण
बस प्रवाशांची अडचणनागपूर : पारडी ते बर्डी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु स्टार बसच्या फेऱ्या मात्र हव्या त्या संख्येने होत नाही. त्यामुळे या मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.रस्ता दुरुस्तीची मागणीनागपूर : बजाजनगर चौक ते काछीपुरा चौकादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. येथील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.रहिवासी भागात उकीरडेनागपूर : शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून, प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. अत्रे लेआऊट येथे आरपीटीएसच्या मागच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.उड्डाणपुलाशेजारीच थाटले दुकाननागपूर : मानकापूर येथील उड्डाणपुलाच्या शेजारीच वस्तूविक्रेत्यांनी दुकान थाटले आहे. यामुळे उड्डाण पुलावरच वाहनचालक थांबतात, शिवाय या मार्गावर वाहने भरधाव वेगात असतात. वस्तू विकत घेण्यासाठी अचानक वाहन थांबविल्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सिमेंट रस्त्यावर अपघाताचा धोकानागपूर : प्रतापनगर येथील सिमेंट रस्त्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. हे काम योग्य तऱ्हेने न बुजवल्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर मोठमोठे खड्डे असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.