शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

थोडक्यात वृत्त

By admin | Published: December 08, 2015 1:52 AM

हर्षवर्धन प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात यश

हर्षवर्धन प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात यश
सोलापूर: हिप्परगा येथील हर्षवर्धन प्रशालेने विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या ‘खेळातून शिक्षण’ या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला. बालभारती विद्यालय, कुमठा नाका येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या साहित्यात चुंबकीय, विद्युत, ध्वनी, ऊर्जा, बल या संकल्पनेच्या स्पष्टीकरणासाठी शिक्षक संजय जवंजाळ यांनी विविध प्रतिकृती तयार केल्या होत्या. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तु. ना. लोंढे, गरड, शं. गो. गंभीरे, मुख्याध्यापक उ. शं. ढेकळे, ब. मा. राऊत यांनी कौतुक केले.
ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर संमेलन
सोलापूर: स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी ड्रीम फाउंडेशनतर्फे दुसरे ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मनपा आयुक्त विजय काळम-पाटील यांची नियोजन समिती बैठकीत निवड झाली. यावेळी कार्याध्यक्षा संगीता पाटील, सतीश पाटील, निमंत्रक काशिनाथ भतगुणकी, विलास हरवाळकर, बसवराज हिरोळे, रवी वाघमोडे, नुरंदया स्वामी, अरविंद टेके, प्रकाश कोळी, गुरुबाळ तावसे आदी उपस्थित होते.
विडी उद्योग वाचवण्यासाठी पवारांना साकडे
सोलापूर: केंद्र शासनाच्या जाचक अटीतून विडी उद्योगाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डा. गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घालण्यात आले. यावेळी पवारांनी पंतप्रधान, कामगार मंत्र्यांशी चर्चा करुन हा उद्योग टिकवण्यासाठी प्रय} करण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. गोवर्धन सुंचू, रवींद्र सरगम, सतीश दासरी, नागनाथ भंडारी, विनायक र्शीगादी, अंबिका गादास, देवम्मा यादव, सविता गादास, सिद्धव्वा येमूल, विजय आडेप आदींसह विडी कामगार उपस्थित होते.
नवयुग ग्रुपतर्फे 63 जणांचे रक्तदान
सोलापूर: शेळगी येथील नवयुग सरगम फ्रेंड्स व साखरपेठ मित्र परिवाराच्या वतीने रविवारी रक्तदान शिबीर पार पडले. संस्थेच्या वतीने हे 63 वे रक्तदान शिबीर होते. या शिबिरात 105 जणांनी रक्तदान केले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरसेवक अमर पुदाले, कुमुद अंकाराम, राजू हौशे?ी, राजू माने, अशोक निंबर्गी, आनंद तालीकोटी, गणेश पवार, कल्लेश गडवीर, सिद्धू स्वामी, हरीश यरगल, विक्रम यरगल, अमर स्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.