थोडक्यात वृत्त
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
धार्मिक कार्यक्रम
धार्मिक कार्यक्रम अहमदनगर : सारसनगरमधील राधाकृष्ण मंदिरात श्रीदेवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ( दि. २०) पासून गोविंद महाराज जाटदेवळेकर श्रीदेवी भागवत कथा सांगणार आहेत. यावेळी मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचा एकाहत्तरी महोत्सव साजरा केला जाणार आहे. ..................गाळ काढण्यास सुरूवातअहमदनगर : मदडगाव येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावातील तलावातून गाळ काढण्यास शुक्रवारी सुरूवात झाली आहे. यावेळी तहसीलदार सुधीर पाटील, सरपंच अनिल शेडोळे, शाखा अभियंता व्ही. आर. खोटे, कृषी सहाय्यक वाय. सी. देशमुख, ग्रामसेवक बी.बी. जाधव आदी उपस्थित होते. ...................पिके धोक्यातअहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ हवामान आहे, यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या हवामानाचा सर्वाधिक धोका भाजीपाला पिकांना बसत असून उन्हाचा कडाका आणि ढगाळ हवामान यामुळे पिकांचे दुहेरी नुकसान होत आहे. ..................चालकांची आरोग्य तपासणी अहमदनगर : एसटी महामंडळाने १९७ चालकांची आरोग्य तपासणी केली. महामंडळाकडून सध्या चालकांची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. नगर विभागतील १९७ कर्मचार्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित चालकांच्या तपासण्या लवकरच करण्यात येणार आहेत. दोन वर्षापासून चालकांची ही आरोग्य तपासणी रखडलेली आहे. ...................वेळ बदलण्याची मागणी अहमदनगर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांची वेळ बदलण्याची मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. सध्या फेबु्रवारी महिना सुरू झाला असून उन्हाचा तडाखा वाढलेला असून त्याचा फटका बालकांना बसणार आहे. यामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत करण्याची मागणी आहे. .....................शाळेचे काम रखडलेअहमदनगर : वांबोरी (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे सहा महिन्यांपूर्वी पत्रे उडाले होते. या कामासाठी जिल्हा परिषदेकडून निधीही मंजूर करण्यात आला असून अद्यापही कामाला सुरूवात झालेली नाही. यामुळे या शाळा खोल्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. ......................चित्रकला परीक्षेत यश अहमदनगर : सारसनगर येथील दामोधर विधाते विद्यालयाने राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला इलेमेंटरी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. विद्यालयातील ३२ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १० विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाला आहे. ...................