शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

ब्रिजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता; अटक होईपर्यंत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 9:10 AM

जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत.

भारतीय कुस्तीचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता अटक होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. दरम्यान जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत.

एफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पोलिस सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार आहे. तसेच या प्रकरणी पोलिस संबंधित पुरावे गोळा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचे आश्वासन दिले होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर एसजी तुषार मेहता यांनी दिल्ली पोलीस आजच एफआयआर दाखल करतील असे म्हणाले होते. 

सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर कुस्तीपटूंनी पत्रकार परिषदेत ब्रिजभूषणला अटक होईपर्यंत आपले आंदोलन संपणार नसल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदांवरून काढून टाकावे, ते त्यांच्या पदांचा गैरवापर करू शकतात. आमचा कोणत्याही समिती किंवा समिती सदस्यावर विश्वास नाही, असे विनेश फोगाट म्हणाली होती. 

टॅग्स :MolestationविनयभंगWrestlingकुस्ती