नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादला गेलेल्या त्यांच्या पत्नी व आईला पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक दिली जाणे हे भारत सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसने बुधवारी केली व आणखी वेळ न घालवता जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.चार दिवसांच्या सुटीनंतर संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी जाधव कुटुंबियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा धिक्कार केला व त्याच बरोबर सरकारलाही धारेवर धरले. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खारगे यांनी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याची मागणी केली.काँग्रेसखेरीज शिवसेना, अण्णाद्रमुक व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही निषेधाची वक्तव्ये केली. शिवसेनेचे अनंत गिते यांनी हा मुद्दा उपस्थित केला व सरकारने आता अजिबात गप्प बसू नये, असा आग्रह केला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यावर स्वत: निवेदन करावे, अशीही सदस्यांची मागणी होती. सभागृहाबाहेर ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. विरप्पा मोईली म्हणाले की, जाधव कुटुंबियांना मिळालेली वागणूक अमानवीय आहे. हे सरकार व परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश आहे. जाधव यांची आई व पत्नी तेथे जाण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने भेटीचा ‘प्रोटोकॉल’ ठरवून घ्यायला हवा होता.>भारताने युध्द करून पाकिस्तानचे चार तुकडे करावेत आणि डोकेदुखी कायमची मिटवून टाकावी, असे मत भाजपा नेते व राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले. सूडाने आणि कपटाने वागणाºया या शेजाºयाला धडा शिकविण्याचा हाच एकमेव मार्ग आहे व त्याची तयारी आत्तापासूनच गांभीर्याने सुरू करायला हवी, असेही स्वामी यांनी म्हटले. आज हे माझे व्यक्तिगत मत असले, तरी यापूर्वी माझी मते नंतर पक्षाचीही मते बनली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
जाधव यांना लगेच भारतात परत आणा, भेटीच्या वेळी अपमान हे सरकारचे अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:00 AM