लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये निषेध व निदर्शनाने स्वागत झाले. भारतात होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात हजारो लोकांनी मोदी लंडनमध्ये असतानाच घोषणाबाजी केली. कास्टवॉच यूके व साउथ एशिया सॉलिडेरिटी ग्रुपच्या नागरिकांनी निदर्शने केली. या वेळी ‘मोदी तुमचे हात रक्ताने रंगले आहेत’, ‘मोदींचे स्वागत नाही’ यासारखे बॅनर पाहावयास मिळाले.कास्ट वॉच यूकेचे प्रवक्ते म्हणाले, देशाच्या एकतेसाठी धोका असलेल्या तसेच हुकूमशाहीकडे जात असलेल्या देशाला रोखण्यासाठी हिंदू राष्ट्रवाद रोखावा लागेल. या वेळी अन्य आंदोलकही उपस्थित होते. त्यांच्या हातात कथुआतील बलात्कारपीडित मुलीचे तसेच पत्रकार गौरी लंकेश यांचे छायाचित्र होते. या निदर्शकांमध्ये ब्रिटनमधील भारतीय महिलांचा सहभाग होता. त्यांनी पांढरे कपडे परिधान करीत मूक निदर्शने केली. दुसरीकडे डाउनिंग स्ट्रीटवर साडी परिधान केलेल्या महिलांनी ढोलच्या गजरात मोदी यांचे स्वागत केले. या वेळी नागरिकांनी ‘चक दे इंडिया’ आणि ‘जय हिंद’चे बॅनर झळकवले. (वृत्तसंस्था)अमेरिकेतही निषेधवॉशिंग्टन : कथुआ अािण उन्नाव प्रकरणाचा निषेध करत भारतीय अमेरिकी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. या प्रकरणी न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. हे हत्याकांड घृणास्पद असून ही गुन्हेगारी बस्स झाली. आता हे थांबायला हवे, अशा घोषणा हे आंदोलक देत होते. महिला आणि लहान मुलांसह मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकी लोक दूतावासाच्या समोर गांधीजींच्या पुतळ्यासमोर एकत्र आले होते.
ब्रिटनमध्ये निदर्शनांनी झाले पंतप्रधान मोदींचे स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:08 AM