नवी दिल्ली : अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इंग्रजांवर गंभीर आरोप केला होता. इंग्रजांनी भारताला 200 वर्षे ओरबाडले आणि तब्बल तीन हजार लाख कोटींची संपत्ती लुटल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी हा आकडा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ उत्सव पटनायक यांच्या शोधनिबंधामधून घेतला आहे. गेल्या वर्षी हा अहवाल प्रसिद्ध झाला होता.
या अहवालानुसार 1765 ते 1938 दरम्यान इंग्रजांनी भारतातून 45 ट्रिलियन डॉलरची संपत्ती लुटली होती. ब्रिटिश शासन काळात भारतातील एक्सचेंज रेट 4.8 अमेरिकी डॉलर प्रति पाऊंड होता. भारतातून जो पैसा ब्रिटनने चोरला तो हिंसाचारासाठी वापरण्यात आला. 1840 मध्ये चीनी घुसखोरी आणि 1857 मध्ये विद्रोह आंदोलनाला दाबण्यासाठी योजना बनविण्यात आली आणि यासाठीचा पैसाही भारतीयांकडून कर रुपात उकळण्यात आला. भारताच्या पैशांतूनच ब्रिटन अन्य देशांमधील लढाया लढत होता आणि कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या देशाचा विकास करत होता.
या भ्रष्ट व्यवस्थेमुळे भारतावर मोठा परिणाम झाला. जगासाठी भारत चांगला व्यवसाय करत होता, चांगला नफा कमावत होता. मात्र, इंग्रजांनी पुढील तीन दशके देश चालवू शकतील एवढा खजिना लुबाडला होता. भारताचा नफा ब्रिटेन लुटून नेत होता. जेव्हा भारतात 1847 मध्ये ब्रिटिशांनी ताबा घेतला तेव्हापासूनच नवीन टॅक्स आणि बाय सिस्टिम सुरू करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीचे काम कमी झाले आणि भारतीय व्यापारी स्वत:च निर्यात करण्यासाठी तयार झाले. या व्यापाऱ्यांना विशेष काऊन्सिल बिलाचा वापर करावा लागायचा. हे एक वेगळे पेपर चलन होते, जे केवळ ब्रिटिश क्राऊनद्वारेच स्वीकारली जात होती. सोने किंवा चांदीच्या बदल्यात लंडनमध्येच ते घेता येत होते.