लंडन : भारतातील मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) लोकांच्या अकाली मृत्यूची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत ही संख्या जवळपास एक लाखावर पोहोचली आहे, असे ब्रिटनमध्ये (Britain)करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम (University of Birmingham) आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन गेल्या आठवड्यात 'सायन्स अॅडव्हान्सेस'मध्ये प्रकाशित झाले. त्यात म्हटले आहे की, वेगाने वाढणाऱ्या उष्णकटिबंधीय शहरांमध्ये 14 वर्षात जवळपास 180,000 लोकांचा मृत्यू वाढत्या वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) झाला, त्यांना वाचवले जाऊ शकले असते.
या शहरांची वाईट अवस्थादक्षिण आशियातील (South Asia) शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या प्रादुर्भावामुळे कमी वयातच लोकांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बांगलादेशातील (Bangladesh) ढाका (Dhaka) येथे अशी सर्वाधिक प्रकरणे समोर आली असून त्यांची संख्या 24 हजार होती. यासह, भारतातील मुंबई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे आणि अहमदाबादमध्ये अशी एकूण एक लाख प्रकरणे समोर आली आहेत.
पेंढा जाळण्याचे मोठे कारणप्रमुख संशोधक डॉ. करण वोहरा यांनी सांगितले की, जमीन साफ करण्यासाठी आणि शेतातील पेंढा याची विल्हेवाट लावण्यासाठी जैव-इंधन उघडे जाळणे हे उष्णकटिबंधीय प्रदेशातील वायू प्रदूषणात (Air Pollution) झपाट्याने वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच, आमचे विश्लेषण असे सांगत आहे की, ही शहरे वायू प्रदूषणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत. काही शहरांमध्ये, परिस्थिती एका वर्षात तितकी बिघडते आहे, जितकी इतर शहरांमध्ये एका दशकात बिघडते, असेही ते म्हणाले.