रोजा इफ्तार पार्टीतून बंधुभाव संदेश
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM
सोलापूर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देऊन बंधुभाव, सलोखा जोपासला जात आहे़ गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजा इफ्तार पार्टी होत आहे़
सोलापूर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देऊन बंधुभाव, सलोखा जोपासला जात आहे़ गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजा इफ्तार पार्टी होत आहे़राजर्षी शाहू महाराज संस्थाकुमठा नाका येथील राजर्षी शाहू महाराज संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली़ याप्रसंगी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, रियाज हुंडेकरी, संभाजी आरमारचे जिल्हाप्रमुख संजय सरवदे, रेवणजी पुराणिक, शिवसेना विभागप्रमुख इब्राहीम पिरजादे, संस्थापक नागेश इंगळे, प्रकाश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते़ आझादी बचाव ग्रुप किडवाई चौकात हत्तुरे हॉलमध्ये आझादी बचाव ग्रुपच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली़ यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, माजी आमदार नरसय्या आडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एफ़वाय़काझी, नलिनीताई कलबुर्गी, प्राचार्य डॉ़ दलाल, नगरसेवक रफिक हत्तुरे, हाजी ए़ यु़ शेख, डॉ़ कादरी, डॉ़ माघामी, डॉ़ हनीफ सातखेड, महिबूब हिरापुरे, हाजी ख्वाजादाऊद पटेल, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एजाज शेख, अजीजभाई पटेल, सलीमभाई लोखंडवाला, एजाज पटेल, अमजद मुजावर, निजाम बिराजदार, इक्बाल दलाल, मिन्हाज पटेल आदी उपस्थित होते़ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संपर्क कार्यालयात रोजा इफ्तार पार्टी करण्यात आली़ यावेळी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा़ राजकुमार सोनवले, मारुती सोनवले, प्रभाकर गायकवाड, जक्कप्पा कांबळे, विनोद इंगळे, सुशील भुताळे, आनंद कांबळे, अभिजित गायकवाड, बबलू इंगळे, अमीर उस्ताद, निसार उस्ताद आदी मान्यवर उपस्थित होते़ यशदा युवती व महिला फाउंडेशनयशदा युवती व महिला फाउंडेशनच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली़ यावेळी आ़ प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ नगरसेविका फिरदोस पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण यांनी त्यांचे स्वागत केले़ याप्रसंगी शहर काझी अमजदअली, महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पक्षनेते संजय हेमगड्डी, मनपाच्या सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील, नगरसेवक देवेंद्र भंडारे, नगरसेवक चेतन नरोटे, रफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी, दत्तोबा बंदपे, माजी महापौर नलिनी चंदेले, बाबासाहेब वाघमारे, परिवहन सभापती सलीम पामा, माजी सभापती सुभाष चव्हाण, कुमूद अंकाराम, नीला खांडेकर, सुनीता कारंडे, सुरेश पाटोळे, सिद्धाराम चाकोते, बशीर शेख, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते़