दलाल महिलेनेच फसवणुक केल्याचा संस्थाध्यक्षाचा दावा
By admin | Published: January 18, 2016 12:16 AM
जळगाव: कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली महिला बचत गटांची फसवणुक झाल्याच्या प्रकरणाला दुसर्या दिवशी वेगळेच वळण लागले. वृत्तपत्रातून भंडाफोड झाल्यानंतर रविवारी संस्थाध्यक्ष अब्दुल सलीम पिंजारी (रा.रावेर) जळगावात दाखल झाले. यात दलाल असलेली सरला मनोज पाटील या महिलेनेच महिलांची फसवणुक केल्याची तक्रार त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनकडे केली. दरम्यान, यावेळी रामेश्वर कॉलनीतील ४० ते ५० महिलाही त्यांच्यासोबत होत्या.
जळगाव: कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली महिला बचत गटांची फसवणुक झाल्याच्या प्रकरणाला दुसर्या दिवशी वेगळेच वळण लागले. वृत्तपत्रातून भंडाफोड झाल्यानंतर रविवारी संस्थाध्यक्ष अब्दुल सलीम पिंजारी (रा.रावेर) जळगावात दाखल झाले. यात दलाल असलेली सरला मनोज पाटील या महिलेनेच महिलांची फसवणुक केल्याची तक्रार त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनकडे केली. दरम्यान, यावेळी रामेश्वर कॉलनीतील ४० ते ५० महिलाही त्यांच्यासोबत होत्या. रामेश्वर कॉलनी, नागदुली व म्हसावद येथील शंभराच्यावर फसवणुक झालेल्या महिला सरला मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंबेडकर मार्केटमधील बहिणाबाई बहुउद्देशीय संस्था व बचत गट मार्गदर्शनच्या कार्यालयात गेल्या होत्या. तेथे उपस्थित कार्यालय अधिक्षिका सविता भालेराव यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. पोलीस बंदोबस्तात त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तेथेही महिलांनी प्रचंड संताप व्यक्त करुन गोंधळ घातला होता. त्यानंतर रविवारी संस्थेचे काही संचालक जळगावात दाखल झाले. त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला सरला पाटील यांच्याविरुध्द तक्रार दिली.३५ गटांकडून घेतले पैसेसंस्थेच्या वतीने अध्यक्ष पिंजारी व कार्यालय अधिक्षिका सविता भालेराव यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही सरला पाटील यांच्या माध्यमातून ३५ गटाच्या ३५० महिलांकडून प्रत्येक पाचशे रुपये घेतले होते. कर्जासाठी तगादा सुरु केल्याने आम्ही त्यांचे एक लाख ८० हजार रुपये परतही केले. त्यामुळे त्यांच्या कर्जाचा विषय संपला होता. मात्र त्यांनी या महिलांकडून तीन हजार रुपये घेतले होते. त्यातील प्रत्येकी अडीच हजार रुपये त्यांनी स्वत:ठेवून घेतल्याने ती रक्कम देणे शक्य नसल्यामुळे सरला पाटील यांनी महिलांना आमच्याविरुध्द भडकावल्याचा आरोप केला.येथे उपस्थित असलेल्या महिलांनीही सरला पाटील यांनी आमच्याकडून प्रत्येकी दीड हजार रुपये घेतल्याचे सांगितले.