शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

दिल्लीत झाडू चोरांचा सुळसुळाट, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातही झाडू कुलुपबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 4:10 PM

Delhi News: कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही सुप्रीम कोर्टाच्या आवारात झाडूला कुलुपबंद करण्याची वेळ का आली याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली -  दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्या झाडू कुलूप लावून रेलिंगशी बांधण्यात आलेल्या दिसून आल्या. हे छायाचित्र अनेक प्रश्न निर्माण करत आहे. एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही सुप्रीम कोर्टाच्या आवारात झाडूला कुलुपबंद करण्याची वेळ का आली याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील आवारात स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितले की लोक त्यांच्या झाडू चोरून घेऊन जातात. त्यामुळे त्यांना नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले. (Broom thieves are rampant in Delhi, brooms are also locked in the Supreme Court premises  )

सर्वोच्च न्यायालयासारख्या कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागामध्ये जर झाडूची चोरी होऊ लागली तर ती धक्कादायक बाब ठरते. येथी रेलिंगवर एकापाठोपाठ एक झाडू ह्या ताळे लावून लॉक करण्यात आल्या होत्या. याबाबत येथे काम करणाऱ्या जसवंती नामक स्वच्छता कर्मचाऱ्याने सांगितले की, अनेक लोक झाडू चोरून घेऊन जातात त्यामुळे आम्हाला झाडूंना कुलूप लावून सुरक्षित करावे लागते. एका झाडूची किंमत १०० रुपये आहे. तसेच कुलुपाची किंमतही एवढीच आहे. लोकांना फुकटात वस्तू हवी असते, त्यामुळे ते झाडू उचलून घेऊन जातात. त्यांना सारे काही आयते हवे असते.

दरम्यान, रेणू नामक अजून एका  महिला सफाई कर्मचाऱ्याने सांगितले की, झाडू चोरणारे चोर कधी पकडले गेलेले नाहीत. जे झाडू चोरी करतात. ते चोरी रात्रीच्या वेळी करतात. जर दिवसा त्यांनी ताळे तोडले तर आम्ही अशा चोराला बघून त्याची पिटाई करू. मात्र हे चोर रात्रीची संधी साधतात कारण त्यावेळी आम्ही येथे नसतो.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय