श्रीनगर: भारतीय पोलीस सेवेत असलेल्या अधिकाऱ्याचा भाऊ हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला आहे. शमसुल हक मेंगनू असं त्याचं आहे. पोलिसांनी शमसुलचं छायाचित्र पोलिसांकडून केलं आलं आहे. यामध्ये त्याच्या हातात एके-47 रायफल असल्याचं दिसत आहे. शमसुलचे भाऊ इनामुल हक 2012 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते सध्या ईशान्य भारतात कर्तव्यावर आहेत. याआधी रविवारी डोडा जिल्ह्यातील आबिद भट नावाचा तरुणदेखील दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती मिळाली, असं डोडा जिल्ह्याच्या एसएसपींनी सांगितलं. '30 जूनपासून बेपत्ता झालेल्या आबिद भटनं दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याची माहिती आम्हाला मिळाली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. याआधी त्याच्या नावार कोणतीही गुन्ह्याची नोंद नव्हती,' असं त्यांनी सांगितलं. आबिद भटनं दहशतवादी संघटनेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. आबिदनं दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा घरी परतावं, असं आवाहन त्याच्या कुटुंबीयांनी केलं. याआधी पुलवामातील एक विशेष पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाला होता. तर एप्रिलमध्ये शोपिया जिल्ह्यातून मीर इदरीश सुलतान नावाचा शिपाई बेपत्ता झाला होता. त्यानंतर तो हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सहभागी झाल्याची माहिती समोर आली होती.
आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 11:44 AM