मिर्झापूरमध्ये एका मुलीने आपल्या मामाच्या मुलाशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. दोघांचे प्रेमप्रकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरू होतं. तरुणी बहिणीच्या लग्नासाठी प्रियकराच्या घरी आली होती. लग्न पूर्ण झाल्यानंतर तिनेही प्रियकराशी लग्न करण्याचा हट्ट धरला. प्रथम कुटुंबीयांनीही विरोध केला. मात्र मुलगी आणि मुलाच्या जिद्दीपुढे त्यांना झुकावे लागले आणि दोघांचेही लग्न झाले. भाऊ-बहिणीच्या नात्यात दिसणाऱ्या मुला-मुलीच्या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.
प्रयागराज येथील रहिवासी असलेली ही मुलगी विंध्याचल पोलीस स्टेशन हद्दीतील गावात तिच्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी कुटुंबासोबत आली होती. लग्न झाले होते आणि सगळे नातेवाईक निघून गेले होते. घरातील लोकही मुलीला सोबत घेऊन जाऊ लागले, त्यानंतर तिने घरी जाण्यास नकार दिला. ती म्हणू लागली की तिला तिच्या मामाच्या मुलाशी लग्न करायचे आहे. मुलीचे बोलणे झाल्यावर तो मुलगाही म्हणू लागला की त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिला तिच्याशी लग्न करायचे आहे.
मुलगा आणि मुलगी नात्याने भाऊ-बहीण होते. तरुण मामाचा मुलगा होता आणि तरुणी आत्याची मुलगी होती. अशा स्थितीत भाऊ-बहिणीचे लग्न कसे होणार, असा विचार कुटुंबीय व नातेवाईकांच्या मनात येऊ लागला. या लग्नाला सर्वांनी नकार दिला. पण दोघेही ठाम राहिले. 2017 पासून ते एकमेकांवर प्रेम करत असून लग्न करू इच्छित असल्याचे दोघांनी सांगितले.
प्रेमी युगुलाच्या आग्रहापुढे सर्वच तयार झाले आणि मग सर्वांनीच त्यांचे लग्न करण्यास होकार दिला. यानंतर मुलीच्या पालकांच्या अनुपस्थितीत तिचे काका-काकू कन्यादान करण्यास तयार झाले. 15 मार्च 2023 रोजी गावातील राम-जानकी मंदिरात या प्रेमी युगुलाचा विवाह झाला. या लग्नाला गावातील लोक उपस्थित होते. दोघेही त्यांच्या लग्नात खूप आनंदी दिसत होते आणि लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"