ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या दोन बॉम्बस्फोटामध्ये जेट एअरवेजचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. जेट एअरवेजच्या दोन महिला क्रू सदस्य जखमी झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जेट एअरवेजने ब्रसेल्सला जाणारी आणि ब्रसेल्सवरुन येणारी सर्व उड्डाणे २६ मार्च २०१६ पर्यंत रद्द केली आहेत. ब्रसेल्स विमानतळावरील जेट एअरवेजचे विमान सुरक्षित असून, सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती जेट एअरवेजने दिली आहे.
जेटने ब्रसेल्स टू नेवार्क, टोरांटो, मुंबई आणि दिल्ली विमान रद्द केले आहे तसेच बुधवारचे मुंबई-दिल्ली-ब्रसेल्स विमानही रद्द केले आहे. स्फोट झाला त्यावेळी जेट एअरवेजचे विमान ब्रसेल्स विमानतळावरुन उड्डाण करणार होते. जिथे डिपार्चर हॉलमध्ये स्फोट झाला तिथे अनेक भारतीय होते.
However, an Indian lady crew member of Jet Airways is injured. She has been rushed to the hospital: EAM Sushma Swaraj's tweet— ANI (@ANI_news) March 22, 2016
Jet Airways Statement:#Brusselspic.twitter.com/BvsozEY0xm— Jet Airways (@jetairways) March 22, 2016