BS Yediyurappa Retirement: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. शुक्रवारी (24 फेब्रुवारी) त्यांनी विधानसभेत शेवटचे भाषण केले. येडियुरप्पा म्हणाले, "मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण भाजपला विजय मिळवून देण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हे माझे एकमेव ध्येय आहे आणि मला खात्री आहे की, ते नक्की होईल." कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता.
'भाजपचा सदैव ऋणी राहीन...'दरम्यान, बुधवारी (22 फेब्रुवारी) येडियुरप्पा यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते. आपल्या निरोपाच्या भाषणात येडियुरप्पा म्हणाले की, 'अनेकदा विरोधकांनी भाजपने मला बाजूला केले आहे, अशी टिप्पणी केली होती, परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतक्या संधी इतर कोणत्याही नेत्याला मिळालेल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी सदैव ऋणी राहीन."
पंतप्रधानांनी भाषणाचे कौतुक केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बीएस येडियुरप्पा यांच्या निरोपाच्या भाषणाचे कौतुक केले आणि म्हणाले की, येडियुरप्पा पक्षाचे नैतिकता प्रतिबिंबित करतात. भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मला हे भाषण खूप प्रेरणादायी वाटले. त्यांनी पक्षाच्या नीतिमत्तेचे दर्शन घडवले. यामुळे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल."