रायपूर : छत्तीसगढमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत रविवारी बीएसएफचे दोन जवान शहीद तर एक जवान जखमी झाला आहे. लोकेंदरसिंग व मुकधियार सिंग अशी शहीद जवानांची नावे असून ते अनुक्रमे राजस्थान, पंजाबचे रहिवासी आहेत.नक्षलवादविरोधी मोहिमेवरुन परतताना बीएसएफच्या ११४व्या बटालियनमधील जवानांवर बालकोट गावाजवळील जंगलात नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढविला. त्यामुळे या बटालियनच्या मदतीकरिता आणखी बीएसएफ जवानांची कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली. चकमकीत जखमी झालेल्या जवानाला उपचारांसाठी रायपूर येथे नेण्यात आले आहे.
बीएसएफचे २ जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 4:49 AM