जयपूर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश कोरोनासारख्या मोठ्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमध्ये सीमा सुरक्षा दल (BSF) च्या कँपमध्ये एका हवालदाराने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील रेणुका सीमा चौकीवर रविवार सकाळी ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. सीमा सुरक्षा दलाच्या 125व्या बटालियनचं एक यूनिट तैनात करण्यात आलं आहे. शिवचंद्र राम असं बीएसएफ हवालदाराचं नाव आहे. शिवचंद्र राम यांचा वरिष्ठ अधिकाऱ्याशी उशिरा येण्यावरून वाद झाला. पुढे हा वाद टोकाला गेला. याच दरम्यान शिवचंद्र यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
शिवचंद्र राम यांना अधिकाऱ्याने सकाळी लवकर गेट उघडण्यासाठी सांगितलं होतं. मात्र गेट उघडायला उशीर झाल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. रागाच्या भरात हवालदाराने अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेनंतर कँप परिसरात उपस्थित असलेल्या जवानांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहे. तसेच या दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक
CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet