पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमारेषेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलाने पाच घुसखोरांना ठार केले असून ही चकमक तरन तारनच्या खेमकरन भागात झाली. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
बीएसएफच्या 103 बटालियनच्या जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकीवर काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. यानंतर पहाटे 4.45 वाजता बीएसएफच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. याला जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले. सकाळी या भागातून पाच पाकिस्तानी घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. हे घुसखोर तस्कर होते की दहशतवादी याबाबत तपास सुरु असून अन्य परिसरातही शोधमोहिम तीव्र करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सकाळी दिल्लीतही मोठी कारवाई करण्यात आली. या एन्काऊंटरमध्ये इसिसच्य़ा दहशतवाद्याला आयईडी बॉम्बसह ताब्यात घेण्यात आले. तर दुसरा दहशतवादी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात येऊ शकते.
दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. IED स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अब्दुल युसूफ या दहशतवाद्याकडून दोन IED स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चकमकीदरम्यान तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा
शिबू सोरेन यांना कोरोना; झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही होणार टेस्ट
सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला ''लवकरच अटक होणार''
65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य
वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द
Railway Recruitment : रेल्वे भरती! जागा वाढल्या, संधी साधावी; विना परिक्षा होणार निवड
युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप