शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

थरार...! नेपाळमध्ये दोन तास हवेतच अडकला 73 प्रवाशांचा श्वास; मग अचानक झाला चमत्कार...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:19 AM

अनेकदा कमी प्रकाश आणि खराब हवामानामुळे नेपाळमध्ये विमाने काठमांडूला परततात. मात्र, यावेळी तसे नव्हते आणि लोकांच्या जीव संकटात सापडला होता.

काठमांडू- नेपाळमधील बुद्ध एअरचे विमान सोमवारी लँडिंग गिअर अडकल्याने जवळपास दोन तास हवेतच अडकून होते. या विमानात तब्बल 73 प्रवासी होते. विमानाचा लँडिंग गिअर अडकल्याने हे सर्व प्रवासी प्रचंड भयभीत झालेले होते. मात्र, नंतर अचानक एक चमत्कार घडला आणि हे प्रवासी विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. तत्पूर्वी, विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे विमानाचे लँडिंग गिअर अडकले आहेत, असे एअर होस्‍टेसने प्रवाशांना सांगितले होते. (Buddha air plane with 73 onboard suffers landing gear failure then miracle happened in Nepal )

सांगण्यात येते, की हे विमान विराटनगर विमानतळावर उतरनार होते. मात्र, नंतर ते काठमांडू येथे नेण्यात आले. बुद्ध एअर फ्लाइट क्रमांक बीएच 702 एटीआर -72 मध्ये एकूण 73 प्रवासी होते. हे विमान काठमांडूहून विराटनगरला रवाना झाले होते. पण लँडिंग गिअरमध्ये समस्या निर्माण झाल्याने त्याला काठमांडूला परत जावे लागले. यादरम्यान प्रवासी प्रचंड भयभीत झाले होते. कारण, प्रवासी विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये काही समस्या निर्माण झालीच, तर त्याचे एकतर फोर्स लँडिंग करावे लागते अथवा ते विमान कोसळत असते.

विमानातलं इंधन संपलं अन् झाला चमत्‍कार -अनेकदा कमी प्रकाश आणि खराब हवामानामुळे नेपाळमध्ये विमाने काठमांडूला परततात. मात्र, यावेळी तसे नव्हते आणि लोकांच्या जीव संकटात सापडला होता. सांगण्यात येते, की वैमानिकाने अनेक वेळा काठमांडूमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपयश आले. यानंतर एअर होस्टेसने प्रवाशांना सांगितले, की विमान क्रॅश होऊ नये, यासाठी त्यातील इंधन संपविण्यात येत आहे आणि फोर्स लँडिंग करण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

विमानाचे फोर्स लँडिंग होण्याची शक्यता लक्षात घेत, धावपट्टीजवळ सुरक्षा दल, रुग्णवाहिका, अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली. दरम्यान, पायलटने सूचना दिली, की आता लँडिंगचा शेवटचा प्रयत्न केला जात आहे, लोकांनी स्वतःला खुर्चीला बांधून घ्यावे. इतक्यात चमत्कार झाला आणि विमानाचे लँडिंग गिअर उघडले. यानंतर एटीसीने पायलटला सांगितले, की आता आपण सुरक्षितपणे उतरू शकता. यानंतर विमान सुखरूप उतरले. या चमत्काराने सर्व प्रवाशांचा जीव वाचला.

टॅग्स :NepalनेपाळairplaneविमानKathmanduकाठमांडूpassengerप्रवासी