नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरसोशल मीडियावरुन टीका होत आहे. अशा पोस्टविरोधात सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोविड नियमावलीचा भंग तसेच असंबंध असल्याची कारणे देऊन केंद्र सरकारने या पोस्ट हटविण्यासाठी ट्वीटर आणि फेसबुकला नोटिसा बजावल्या आहेत.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुमारे १०० पोस्ट हटविण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. चित्रपट अभिनेता विनीतकुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी, खासदार रेवंथ रेड्डी, अविनाश दास इत्यादींनी कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका ट्वीटरवरुन केली होती. त्याबाबत मंत्रालयाने म्हटले आहे की या पोस्ट जुन्या असून सध्यस्थितीत त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच काही पोस्ट या चुकीच्या असून जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीने संवेदनशील होत्या.
एकीकडे संपूर्ण देश कोरोनासोबत लढत असताना काही जण सोशल मीडियाचा गैरवापर करून भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावरुन अशा पोस्टचे युआरएल हटविण्यास सांगण्यात आले आहे.
कोणत्या पोस्ट करता येणार नाहीत-
- ट्वीटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील काही वापरकर्त्यांवर कोरोनासंबंधी माहिती, ऑक्सिजन, बेड्स, औषधे इत्यादींच्या
- उपलब्धतेबाबत पोस्ट करणे किंवा थेट मेसेज करण्यापासून निर्बंध लावण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र यास नकार दिला आहे.
- आयटी नियमांचा भंग झाल्यास संबंधित खाते ब्लॉक करण्यात येते किंवा मजकूर हटविण्यात येतो, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
- सरकारच्या कारवाईवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी टीका केली आहे. त्यांनी हटविण्यात आलेल्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स स्वत:च्या ट्वीटरवर शेअर करुन प्रश्न उपस्थित केला आहे.
- मध्ये कोणती आणि कुठे चुकीची माहिती असल्याचा प्रश्न करुन सत्य कसे डिलिट केले जाऊ शकते, हे पाहू, असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.