ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - मोदी सरकारनं पहिल्यांदाच ब्रिटिशांच्या परंपरेला बगल देत केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र सादर केला आहे. जेटलींनी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 21 लाख 47 हजार कोटींच्या जवळपास असणा-या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना बळकटी देणारे महत्त्वपूर्ण अशा 10 घोषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात या घोषणा अंमलात आल्यास पायाभूत सुविधांना चालना मिळून भारत प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होईल. अर्थसंकल्पात सामान्यांसाठी प्राप्तिकरातही मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच टॅक्स स्लॅबमध्ये बदल न करता सामान्यांनाही दिला देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या अर्थसंकल्पात कोणत्या 10 मोठ्या घोषणा करण्यात आल्यात ते पाहुयात.
अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा1. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 3,96,135 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार2. ग्रामीण, कृषी आणि त्यासंबंधित क्षेत्रासाठी 2017-18च्या अर्थसंकल्पात 1,87,223 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गेल्या वर्षापेक्षा 24 टक्क्यांनी अधिक आहे3. रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यातील 55 हजार कोटी रुपये सरकार रेल्वे मंत्रालयाला देणार आहे.4. राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आली5. डेअरी पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या निधीमुळे ग्रामीण भागात अधिकचे 2017-18 वर्षांत 50000 कोटी रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. 6. मोदी सरकार 2019पर्यंत 1 कोटी घरं बनवणार असून, त्यामुळे घर नसलेल्या आणि कच्च्या घरात राहणा-या लोकांना त्याचा फायदा होणार आहे.7. वाहतूक क्षेत्रासाठी 2.41 लाख कोटी रुपये आणि भारत नेट प्रोजेक्टसाठी 10000 कोटींची तरतूद 8. रेल्वेच्या 3500 किलोमीटर रेल्वे रुळ 2017-18 पर्यंत सुरू करणार9. मेट्रो रेल्वेच्या नव्या पॉलिसीची लवकरच घोषणा करणार10. व्यापार इन्फ्रास्ट्रक्चर निर्यात योजना 2017-18 मध्ये सुरू करणार