नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सध्याच्या रालोआ सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला. शेती, पशुधनविकास, पायाभूत सुविधांबाबत केलेल्या घोषणांबरोबर एक महत्त्वाची घोषणा जेटली यांनी केली. आयआयटी आणि आयआयएससी अशा उच्च संस्थांमध्ये पीएच.डीसाठी 1000 बी.टेक विद्यार्थ्यांना प्राइम मिनिस्टर फेलोशिप देण्याची घोषणा त्यांनी केली.प्राइम मिनिस्टर फेलोशिपची सुरुवात यावर्षी करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील बी.टेक झालेली सर्वोत्तम 1000 मुले निवडून त्यांना इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलजी आणि इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्समध्ये पी.एचडी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सुविधा पुरवल्या जातील असे जेटली यांनी भाषणामध्ये या योजनेबाबत सांगितले. त्याचप्रमाणे वडोदरा येथे विशेष रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांमध्ये वाहतुकीसाठी प्रस्तावित असलेल्या बुलेट ट्रेनसाठी लागणाऱ्या तज्ज्ञांचे प्रशिक्षण येथे होईल असे त्यांनी जाहीर केले. नियोजन आणि वास्तूस्थापत्य या विषयांसाठी 18 नव्या संस्थांची आयआयटी आणि एनआयटीमध्ये करण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. भारतातील उच्च शिक्षणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल.
1000 बी.टेक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी प्राइम मिनिस्टर फेलोशिप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 1:59 PM