नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण बजेट आज मांडलं. जवळपास 1 तास 45 मिनिटं चाललेल्या आपल्या भाषणात अरुण जेटली यांनी शिक्षण, रोजगार आणि आरोग्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. बजेट सादर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मात्र आपली मतं मांडण्यास सुरुवात केली असून आपल्या तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प मांडला गेल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना तोंडभरुन कौतुक केलं. ते बोलले की, 'केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या विकासाला गती देणारं बजेट असून शेतीप्रिय आहे. गरिब आणि मध्यमवर्गाची चिंता दूर करणारं हे बजेट आहे. बजेटमध्ये इज ऑफ लिव्हिंगवर लक्ष्य केंद्रित करण्यात आलं असून शेतक-यांची स्थिती मजबूत करणारं हे बजेट आहे'.
काँग्रेसची अर्थसंकल्प नकारात्मक असल्याची टीकाकाँग्रेसने अर्थसंकल्प नकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी अर्थसंकल्पावर प्रश्न उभे केले आहेत. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या सर्व घोषणा गतवर्षीच्याच असून, या अद्याप पुर्ण करण्यात आलेल्या नाहीत असा टोला त्यांनी लगावला.
नितीश कुमारांनी केलं अभिनंदनअर्थसंकल्प भाषण पुर्ण होताच सर्वात आधी बिहारमध्ये एनडीएसोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदी सरकारचं अभिनंदन केलं.
जनतेच्या कानाखाली मारणारं बजेट - अखिलेश यादवसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही बजेटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव यांनी हे बजेट महिला, नोकरदार आणि सामान्यांच्या कानाखाली लगावणारं असल्याचं म्हटलं आहे.
आम आदमी पक्षाची 'पकोड बजेट' असल्याची टीकानुकतेच राज्यसभा खासदार झालेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी हा अर्थसंकल्प जुमला असल्याची टीका केली आहे. हे पकोडा बजेट असल्याचीही खोचक टीका त्यांनी केली.
शेतक-यांसोबत फसवणूकस्वराज्य इंडियाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांनी अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे बजेट शेतक-यांसाची फसवणूक करणारं असल्याचं म्हटलं.