नवी दिल्ली : केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर समारोप करताना अर्थमंत्री पियुष गोयल यांनी चक्क मूळचे महाराष्ट्रीयन असलेल्या कवीच्या कवितेच्या दोन ओळी सादर केली.यावेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नेहमीप्रमाणे शेरोशायरीचा भडिमार नव्हता, मात्र अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पाचा समारोप करता करता महाराष्ट्रीयन कवीची कविता सादर केली. हिंदीतील या विख्यात कवीचा सन्मानपूर्वक उल्लेख करुन ते म्हणाले,एक पांव रखता हूँहजार राहे फूट पडती हैटाळ्यांच्या गजरात आणि वाह वा च्या जल्लोषात साऱ्यांनीच पियूष गोयल यांनी सादर केलेल्या या कवितेच्या दोन ओळींचे कौतुक केले.गोयल म्हणाले, की आपण नव्या भारताच्या निर्मितीसाठी इतके नवीन सशक्त आणि प्रभावी पाउल उचलले आहे, की आता देशाच्या प्रत्येक क्षेभात अनंत शक्यतांनी भरलेला देश पाहिला जाउ शकतो.
हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नाही, तर देशाच्या विकासाची यात्रा आहे. हा जो देश बदलत आहे, देशवासियांच्या उत्साहाने बदलत आहे. त्याचे सारे श्रेय आणि यश देशातील जनतेलाच आहे.