भारताला दहा खर्व डॉलरची अर्थव्यवस्था बनवून देशातील जनतेचे जीवन आनंदी व सुखवस्तू करण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देत पीयूष गोयल यांनी या स्वप्नपूर्तीची दशसूत्रीही मांडली. यात सामाजिक व पायाभूत सुविधांची भक्कम उभारणी, विकासगंगा देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची कांस धरणे, प्रदूषणमुक्त विकास, ग्रामीण औद्योगिकीकरण, नद्यांचे शुद्धिकरण, सागरी किनाºयांचा आर्णिक विकास, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्यसंपन्न जनता आणि संघभावना याचा त्यांनी उल्लेख केला.1. करदाते : करमुक्त उत्पन्न पाच लाख रुपये.2. शेतकरी : छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये.3. असंघटित कामगार: २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणाºयांना ७ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.4. श्रमयोगी मानधन: १५ हजारांहून कमी उत्पन्न असणाºया कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन.5. ग्रॅच्युइटी : कामगारांना मिळणाºया ग्रॅच्युइटीची रक्कम १० लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढविली.6. वित्तीय क्षेत्र : बॅँक, पोस्ट ठेवींवरील व्याजाच्या करकपातीच्या मर्यादेत वाढ.7. डिजिटल इंडिया: पाच वर्षांमध्ये १ लाख डिजिटल गावांची निर्मिती.8. प्रत्येकाला घर: सन २०२०पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे असेल स्वत:चे घर.9. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये १० हजार रुपयांची वाढ, आता मर्यादा ५० हजारांची.10. दुसऱ्या घराच्या खरेदीवर कर नाही.
Budget 2019: मतांसाठी साखर पेरणी; 'या' 10 घोषणा सर्वाधिक लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 6:16 AM