शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
3
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
4
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
5
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
6
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
7
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
8
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
9
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
10
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
11
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
12
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
13
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
14
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
15
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
16
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
17
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
18
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Budget 2020: आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 3:00 PM

केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते.

ठळक मुद्देआज सरकारने एलआयसीमधील सरकारची भागीदारी विकण्याची घोषणा केली.एलआयसी ही पहिलीच सरकारी विमा कंपनी नसून याआधी दोन कंपन्यांचे आयपीओ सरकारने आणले आहेत.एलआयसी सध्या इरडाच्या नियंत्रणाखाली येते.

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीबाबत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारीसुद्धा सरकार विकणार आहे. मात्र, विमा क्षेत्रातील सरकारी कंपनीमधील भागीदारी विकण्यात येणारी एलआयसी ही पहिलीच कंपनी नाहीय. तर याआधी तीन वर्षांपूर्वी दोन सरकारी विमा कंपन्यांचे आयपीओ तयार करण्यात आलेले आहेत. 

केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते. यानंतर बीएसएनएल, एलआयसी या मोठ्या सरकारी कंपन्यांचा नंबर असल्याचे म्हटले जात होते. आज सरकारने एलआयसीमधील सरकारची भागीदारी विकण्याची घोषणा केली.

एलआयसी ही पहिलीच सरकारी विमा कंपनी नसून याआधी दोन कंपन्यांचे आयपीओ सरकारने आणले आहेत. तीन वर्षांपूर्वी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि न्यू इंडिया अशुरन्सचे आयपीओ शेअर बाजारात नोंद करण्यात आले आहेत. एलआयसीच्या भागीदारी विक्रीचा फायदा सरकारला होणार असला तरीही त्यासाठी सरकारला कायद्यात बदल करावे लागणार आहेत. सरकारने नुकताच आयआरसीटीसीचा आयपीओ उभारला होता. मात्र, आयआरसीटीसी ही कमर्शिअल उद्देशाने स्थापन केलेली कंपनी होती. एलआयसीच्या बाबतीत तसे नाही. 

एलआयसी सध्या इरडाच्या नियंत्रणाखाली येते. मात्र, एलआयसी कायदा 1956 नुसार इरडाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त समभाग विकण्यासाठी एलआयसीला परवानगी नाही. एलआयसी कायद्याच्या सेक्शन 37 नुसार एलआयसी पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकारने सर्व पॉलिसींना बोनससह ठराविक रक्कम द्यावी लागते. यामुळे या कायद्यानुसार एलआयसी आणखी समभाग विकू शकत नाही. हा कायदा बदलावा लागणार आहे.

सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

नितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणार

एलआयसीचा आयपीओ आल्यास....एलआयसीचा आयपीओ आल्यास त्याचा सर्वात मोठा फटका रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला बसण्याची शक्यता आहे. सध्या या कंपन्या शेअर बाजारात आघाडीवर आहेत. लोकांच्या एलआयसीवरील विश्वासामुळे हे होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :budget 2020बजेटbudget did you knowबजेट माहितीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनLIC - Life Insurance CorporationएलआयसीNarendra Modiनरेंद्र मोदी