नवी दिल्ली : शुक्रवारी जाहीर केल्या गेलेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही आकडेवारी विकीपीडिया या वेबसाईटवरून घेतले गेल्याचे समोर आले आहे. यामुळे या अहवालाच्या विश्वसनियेवरच सवाल उठविण्यात आले आहेत. सोशल मिडीयावर काही युजर्सनी सरकारला प्रश्न विचारला आहे. यापुढचा अहवाल काय व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या आकडेवारीवरून घेणार, असा खोचक प्रश्न विचारला आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार सर्व्हेमध्ये विकीपीडीयाशिवाय ब्लूमबर्ग, इक्रा, सीएमआयई, आयआयएम-बेंगळुरू, फोर्ब्स आणि बीएसईसारख्या खासगी संस्थांकडूनही आकडेवारी घेण्यात आली आहे. विकीपीडिया फाऊंडेशन मोफत ऑनलाईन एन्साइक्लोपीडिया चालविते. यामध्ये जगभरातील लोक माहिती टाकतात आणि अपडेटही करतात. या माहितीला कोणीही व्यक्ती एडीट करू शकतो, यामुळे ही माहिती विश्वास ठेवण्यासारखी नाही.
आर्थिक सर्व्हेच्या अहवालात 150 आणि 151 नंबरच्या पानावर विकीपीडियाचा उल्लेख आहे. हा उल्लेख जगाताली आघाडीच्या 100 बँकामध्ये भारतीय बँकांचा हिस्सा याच्याशी संबंधित आकड्यांमध्ये आला आहे. देशाचा जीडीपीच्या आकडेवारीमध्येही सोर्स विकीपीडिया असल्याचे म्हटले आहे.
Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी
आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीने दिला पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला मोठा झटका
येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.5 टक्के राहणार, आर्थिक सर्व्हे सादर
महत्वाचे म्हणजे या सर्व्हेमध्ये भगवदगीता, ऋग्वेद, कौटिल्यचे अर्थशास्त्र, तामिळ संत तिरुवल्लुवूरचे ‘द तिरुकुरल’, अॅ़डम स्मिथचे पुस्तक ‘अॅन इंक्वायरी इन टू नेचर अँड कॉझेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशंस’ आदी ग्रथांमधील उदाहरणेही देण्यात आली आहेत.