मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला थेट फटका बसला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम उद्योगविश्वावर झाला. आता हळूहळू अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येऊ लागला. मात्र कोरोना काळात वाढलेला खर्च आणि घटलेलं उत्पन्न यांचा ताळमेळ अद्याप बसलेला नाही. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. नागरिकांना दिलासा देऊन सरकारची तिजोरी भरण्याची कसरत त्यांना करावी लागेल.1 फेब्रुवारीपासून होणार 'हे' मोठे बदल, ज्याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होऊ शकतोकोरोना काळात सरकारचा खर्च वाढला आहे. देशात लवकरच सर्वसामान्यांना कोरोना लस दिली जाईल. कोरोना लसीची किंमत, वाहतुकीवर येणारा खर्च लक्षात घेतल्यास यासाठी साधारणत: ६० ते ६५ हजार कोटी रुपये खर्च येईल. सध्याच्या घडीला सरकारकडे असलेले उत्पन्नाचे पर्याय अतिशय मर्यादित आहेत. त्यामुळे सरकार कोविड सेस लावण्याच्या विचारात असल्याचं वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे. सरकारनं कोविड सेस लावल्यास तुम्ही भरत असल्यास आयकरात वाढ होऊ शकते.यंदाचं बजेट 'पेपरलेस', अर्थमंत्र्यांकडून Union Budget Mobile App लाँचसरकार एखाद्या विशिष्ट खर्चासाठी उपकर (सेस) आकारतं. सध्याच्या घडीला सरकार करदात्यांकडून मिळणाऱ्या थेट करांवर ४ टक्के उपकर आकारतं. आरोग्य आणि शिक्षणासाठी हा उपकर आकारण्यात येतो. २०१८ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलींनी या उपकराची घोषणा केली. या माध्यमातून मिळणारी रक्कम आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांवर खर्च करण्यात येते. २०१८ च्या आधी ३ टक्के उपकर आकारला जात होता. यातील २ टक्के शैक्षणिक सुविधांसाठी, तर १ टक्का माध्यमिक शिक्षणासाठी आकारण्यात येत होता.करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार?सरकारनं कोविड उपकर लावल्यास खिशावर किती भार?आता सरकारनं २ टक्के उपकर लावल्यास एकूण उपकर ६ टक्क्यांवर जाईल. त्यामुळे करदात्यांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडेल. उदा. एखाद्या व्यक्तीचं करपात्र उत्पन्न १ लाख असल्यास त्याला सध्या ४ टक्के उपकर भरावा लागतो. सध्या ही रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे. यामध्ये आता २ टक्के कोविड उपकराची भर पडल्यास ६ हजार रुपये उपकर म्हणून भरावी लागेल. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या खिशावर २ हजारांचा अतिरिक्त भार पडेल.
Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By कुणाल गवाणकर | Published: January 29, 2021 1:50 PM