नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत, यावेळी केंद्र सरकारने राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० पूर्णपणे तयार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी एकूण १.१० लाख कोटींचे बजेट केंद्र सरकारकडून रेल्वेला देण्यात आलं आहे.
भारतीय रेल्वेसोबत सार्वजनिक परिवहन सेवेला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यासाठी रेल्वेशिवाय मेट्रो आणि परिवहन बस सेवा वाढवण्यावर फोकस करण्यात आला आहे. १८ हजार कोटींची गुंतवणूक मेट्रो आणि इतर परिवहन सेवेवर खर्च करण्यात येणार आहेत. मेट्रोचं जाळ शहरात पसरवण्यावर जोर दिला जाईल. यात कोच्ची, बंगळुरू, चेन्नई यांच्यासह महाराष्ट्रातल्या नागपूर, नाशिक शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. (Budget 2021 Latest News and updates)
याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हायवे प्रकल्पावरही भर दिला आहे. तामिळनाडू नॅशनल हायवेसाठी १.०३ लाख कोटींची घोषणा केली आहे, यात इकॉनोमिक कॉरिडोर बनवला जाईल, केरळमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग उभारले जातील, मुंबई-कन्याकुमारी इकॉनोमिक कॉरिडोरची घोषणाही यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्येही कोलकाता-सिलीगुडी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचसह आसाममध्ये पुढील ३ वर्षात हायवे आणि इकॉनोमिक कॉरिडोर बनवण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.(Railway & Metro Project)
कोरोनानं शहाणं केलं; आरोग्य क्षेत्रासाठीचं बजेट १३७ टक्क्यांनी वाढवलं!
दरम्यान, कोरोनामुळे देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव आपल्याला करुन दिली. त्यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरुन देण्यात आलं आहे. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल १३७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी देण्यात आले असून गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. यंदा आरोग्य खात्यासाठी तब्बल २ लाख ३२ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प हा ९२ हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजेच, यंदाच्या बजेटमध्ये तब्बल १३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.( Budget 2021 Latest News and updates)
लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री
अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे:
ग्रामीण भागात जलजीवन मिशनसाठी 2.87 लाख कोटी रुपये पुढील पाच वर्षांसाठी खर्च होणार
दुसऱ्या आणि तिसऱ्या टिअरच्या शहरांमध्ये गॅस पाईपलाईनचा विस्तार करणार
17 नवीन पब्लिक हेल्थ युनिट सुरु केले जाणार. 32 विमानतळांवरही असणार. 9 बायोलॅब, चार नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी बांधणार.
जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच लागू करणार