शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

Budget 2021, Infrastructure: मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर; निर्मला सीतारामन यांची ११०० किमीच्या हायवेची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 11:57 AM

Budget 2021 Indian Railway : रेल्वे डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर, NHAI टोल रोड, एअरपोर्ट असेट मॉनेटाइझेशन मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणणार : अर्थमंत्री

ठळक मुद्देनॅशनल रेल्वे प्लॅन २०३० तयार करण्यात आल्याची अर्थमंत्र्यांची माहितीभारतमाला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते तयार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२१ या वर्षांचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच टॅबच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे डेडिकेटेड फ्रन्ट कॉरिडोअर, NHAI चे टोल रोड आणि एअरपोर्टसारख्या ठिकाणांना असेट मॉनिटायझेशन मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणणार असल्याची घोषणा केली. तसंच यावेळी त्यांनी जुन्या गाड्यांना स्क्रॅप केलं जाणार असून त्यामुळे प्रदुषण नियंत्रणात येईल असं म्हटलं. यामुळे इंधनाची बचतही होईल. याव्यतिरिक्त ऑटोमेटेड फिटनेस सेंटर तयार करण्यात येणार असून खासगी गाड्या २० वर्षांनंतर या सेंटरमध्ये न्याव्या लागणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. "भारतमाला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. ८ हजार किलोमीटरपर्यंतचं कंत्राट मार्च महिन्यापर्यंत देण्यात येईल. रोड इन्फ्रा आणि इकॉनॉनिक कॉरिडोअरवर काम सुरू आहे. सध्या तामिळनाडूत ३ हजार ५०० किमीचे रस्ते तयार होत आहेत. यात मदुरै-कोल्लम कॉरिडोअरचादेखील समावेश आहे," असं सीतारामन म्हणाल्या."केरळमध्ये ११०० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी ६५ हजार कोटी रूपये खर्च होतील. मुंबई कन्याकुमारी कॉरिडोअरदेखील याचाच भाग असेल. तर ६,५०० किलोमीटर लांबीचा महामार्ग बंगालमध्ये तयार केला जाईल. यावर २५ हजार कोटी रूपये खर्च केले जातील. यामध्ये कोलकाता-सिलिगुडी रस्त्याची डागडुजीही करण्यात येणार आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Budget 2021 live Infrastructure Mumbai Kanyakumari Corridor Nirmala Sitharaman announces 1100 km highway railway dedicated front corridor नॅशनल रेल्वे प्लॅन २०३० तयार करण्यात आला आहे. फ्युचर रेडी रेल्वे सिस्टम तयार करणं आमचं ध्येय आहे. यात सरकार मेक इन इंडियावर लक्ष केंद्रित करेल. वेस्टर्न आणि इस्टर्न फ्रेट कॉरिडोअर जून २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही सीतारामन म्हणाल्या. मागील अर्थसंकल्पामध्ये ४.२१ लाख कोटी कॅपिटल एक्सपेंडीचरसाठी देण्यात आले होते. यावेळी ४.३९ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. पुढील वर्षासाठई ५.५४ लाख कोटी रूपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आल्याचंही सीतारामन म्हणाल्या.

 

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनrailwayरेल्वेroad transportरस्ते वाहतूकMumbaiमुंबईNational Highwayराष्ट्रीय महामार्ग