शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 1:46 PM

Budget 2021 Live : वाहनांच्या सुट्या भागांवरहील कस्टम ड्युटीतही झाली वाढ, सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीत घट

ठळक मुद्देवाहनांच्या सुट्या भागांवरहील कस्टम ड्युटीतही झाली वाढसोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीत घट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आल्याची घोषणा केली. मोबाईल उपकरणांवर आता २.५ टक्क्यांपर्यंत कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात मोबाईलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोबाईल उपकरणांवर आता २.५ टक्के कस्टम ड्युटी लागू केली जाणार आहे. त्यानंतर आता मोबाईल आणि चार्जर महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणंही महाग होण्याची शक्यता आहे. ऑटो पार्ट्सवरही कस्टम ड्युटी वाढवून ती १५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांचे सुटे भाग महाग होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॉपर आणि स्टीलवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. तर सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीही कमी करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. १ ऑक्टोबर २०२१ पासून देशात हे लागू केलं जाणार आहे. दरम्या काही वस्तूंवर अॅग्रीकल्चरल सेसदेखील लावला जाणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.वित्तीय तूट ६.८ टक्क्यांवरअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणादरम्यान वित्तीय तूट जीडीपीच्या ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला. तसंच यासाठी सरकारला ८० हजार कोटी रूपयांची आवश्यकता भासणार आहे. ती रक्कम येत्या दोन महिन्यांमध्ये बाजारातून घेतली जाणार असल्याचंही अर्थमंत्री म्हणाल्या. याव्यतिरिक्त न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यावेळी PSLV-CS51 लाँच करणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. गगनयान मिशनचं मानवरहित पहिलं लाँच याच वर्षी डिसेंबर महिन्यात होणार आहे. इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत टर्बियूनल तयार करण्यात येणार आहे. यात कंपन्यांची प्रकरणं लवकरात लवकर संपवली जातील. तसंच आगामी जनगणना पहिल्यांदा डिजिटली केली जाईल, असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनGoldसोनंSilverचांदी