शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

मनपाचे ७३३.९८ कोटींचे अंदाजपत्रक

By admin | Published: March 14, 2016 12:21 AM

जळगाव : शहरातील मालमत्तांचे करयोग्य मूल्य निि›त करून मजलेनिहाय कर आकारणी करून ४० टक्के महसूल वाढीचा प्रस्ताव ठेवत बहुमजली बांधकाम असलेल्यांना महापालिका अंदाजपत्रकात दणका देण्यात आला आहे. तब्बल ७३३ कोटी ९८ लाखाचे हे अंदाजपत्रक आयुक्त संजय कापडणीस यांनी स्थायी समितीसमोर सादर केले आहे. त्यास अद्याप स्थायी समितीची व महासभेची मंजुरी मिळणे बाकी आहे.

जळगाव : शहरातील मालमत्तांचे करयोग्य मूल्य निि›त करून मजलेनिहाय कर आकारणी करून ४० टक्के महसूल वाढीचा प्रस्ताव ठेवत बहुमजली बांधकाम असलेल्यांना महापालिका अंदाजपत्रकात दणका देण्यात आला आहे. तब्बल ७३३ कोटी ९८ लाखाचे हे अंदाजपत्रक आयुक्त संजय कापडणीस यांनी स्थायी समितीसमोर सादर केले आहे. त्यास अद्याप स्थायी समितीची व महासभेची मंजुरी मिळणे बाकी आहे.
२०१६-१७ च्या अंदाजपत्रकामध्ये महापालिका उत्पन्न वाढीची प्रक्रिया लक्षात घेऊन त्या प्रमाणात खर्चाचे नियोजन करण्यात आले
दीक्षा भूमीप्रतिकृतीसाठी सव्वाकोटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीउत्सव वर्षानिमित्ताने नागपूरच्या दीक्षा भूमीची प्रतिकृत शहरात उभारली जाणार आहे. या उपक्रमासाठी विशेष बाब म्हणून १ कोटी २५ लाखाची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. भूमी संपादन व दीक्षा भूमिची उभारणी असे यात नियोजन असेल.
कर्जमुक्तीकडे वाटचाल
या आर्थिक वर्षात कर्जफेडीच्या दृष्टीने विविध पाऊल टाकण्याचे संकेत देण्यात आले आहेत. जिल्हा बॅँक व हुडकोकडून महापालिकेने कर्ज घेतले आहे. हुडको कर्ज फेडीसाठी ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरमहा ३ कोटींची परतफेड यात करण्यात येणार आहे. तर जिल्हा बॅँकेचे कर्ज भरण्यासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात दरमहा एक कोटींचा भरणा केला जाणार आहे.
--- मागील वर्षीच्या आश्वासनांचे काय?---
२०१५-१६ चे अंदाजपत्रक ८५२ कोटी ५५ लाखांचे होते. भाजपाकडे प्रथमच स्थायी समितीचे सभापतीपद आल्याने भाजपानेच हा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात मार्केट भाड्याचे अपेक्षित उत्पन्न १२७ कोटी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात १ रुपयाचीही वसुली झालेली नाही. तर घरगुती व व्यावसायिक नळकनेक्शन शोधासाठी नगरसेवकांचा समावेश असलेली समिती स्थापण्याचे जाहीर केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. दिलेली बांधकाम परवानगी व प्रत्यक्ष झालेले बांधकाम यातील तफावत शोधण्यासाठी समिती स्थापण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. नविन संडास, मुतारीसाठीच्या ६५ लाखाच्या निधीतून महिलांच्या सार्वजनिक शौचालयांसाठी व मुतारीसाठी २५ लाखांची तरतूद राखीव ठेवणार, असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम झालेले नाही. रस्त्यावर १० ठिकाणी फायबरच्या मुतारी ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे.