शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

Budget Session 2023: अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 1:33 PM

Budget Session 2023: अदानी समुहाविरोधात हिंडेनबर्ग रिपोर्टमधील आरोपांच्या चौकशीची मागणी विरोधक करत आहेत.

Mallikarjun Kharge Called Opposition Meeting: सध्या देशभरात हिंडेनबर्ग रिपोर्ट (Hindenberg) आणि अदानी (Gautam Adani) समुहाचा मुद्दा गाजत आहे. या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुनच काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता संसदेतील त्यांच्या कार्यालयात विरोधी पक्षांच्या खासदारांची तातडीची बैठक बोलावली. यात 16 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गेंनी बोलावलेल्या बैठकीत चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये कशाप्रकारची रणनीती आखली जावी, यावर चर्चा झाली. काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, सीपीआय(एम), सीपीआय, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन युनियन मुस्लिम लीग, केसी (जोस मणी), के.सी. (थॉमस) आणि आरएसपीचे खासदार बैठकीत सहभागी झाले होते.

नेमकं काय झालं? गुरुवारी (2 फेब्रुवारी) संसदेत उद्योगपती अदानी यांच्याबाबतच्या हिंडेनबर्ग अहवालावरून प्रचंड गदारोळ झाला, त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. अदानी समूहाविरुद्ध हिंडेनबर्ग अहवालात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा संयुक्त संसदीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशीची मागणी विरोधी पक्ष करत आहेत.

दोन्ही सभागृहात गदारोळलोकसभा आणि राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी या मागणीबाबत नोटीस दिली, जी सभापतींनी फेटाळली. यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केला, त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. दरम्यान, काँग्रेसने 6 फेब्रुवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांतील एलआयसी आणि एसबीआयच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :AdaniअदानीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGautam Adaniगौतम अदानीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे