नवी दिल्लीसंसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होणार असून १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कोविड-१९ मुळे दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा २९ जानेवारीपासून सुरू होणार असून ते १५ फेब्रवारीपर्यंत चालेल. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत पार पडेल.
केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २९ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.
कोरोना महामारीमुळे मोदी सरकारने यावेळी हिवाळी अधिवेशन घेतले नव्हते. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी सरकारने अधिवेशन रद्द केल्याची टीका विरोधकांनी केली होती.