नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज संसदेत भाषण केलं. यावेळी त्यांनी सरकारनं केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. माझ्या सरकारनं नव्या भारताचं स्वप्न पाहिलं आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देश अनिश्चिततेच्या परिस्थितीतून जात होता. परंतु माझ्या सरकारनं सत्तेत आल्यानंतर नव्या भारताचा संकल्प केला आणि देशाला या अनिश्चिततेतून बाहेर काढलं. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचा सरकारनं पण केला आहे. मोदी सरकारनं नोटाबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यानं जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढल्याचंही ते म्हणाले आहेत. प्रत्येक गावात गॅस कनेक्शन, सर्वशिक्षा अभियान, सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकडे सरकारनं लक्ष्य दिलं आहे. या लक्ष्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारनं अनेक योजना तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांचं देशाच्या विकासात मोठं योगदान आहे. शेतकऱ्यांना मदत करणं ही सरकारची प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. माझं सरकार मच्छीमाऱ्यांना ट्रेनिंगही देत आहे. कृषी क्षेत्रातही व्यापक बदल केले जात आहेत. मुद्रा योजनेचा लाभ सर्वाधिक महिलांना मिळाल्याचंही राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं आहे.मुद्रा योजनेतून जवळपास 73 टक्के कर्जाचं महिलांना वाटप करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यानंतर महिलांना सशक्त करण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले आहेत. सरकारनं स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवलं आहे. सरकारनं 7 IIT, 7IIMची स्थापना केली असून, स्कॉलरशिप आणि फेलोशिपच्या निधीच्या मर्यादेत 25 टक्क्यांची वृद्धी करण्याचा निर्णय घेतला आहे. 103 केंद्रीय विद्यालय, 62 नवे नवोदय विद्यालय उघडण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे.स्वच्छ भारतअंतर्गत 9 कोटी शौचालयांची निर्मिती केली आहे. सरकारनं 4 वर्षांत 1 कोटी 30 लाख घर तयार केली असून, देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. तसेच आतापर्यंत 21 कोटी जनतेला सुरक्षा विमा पुरविला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत 6 कोटींहून जास्त गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहेत, रेरा कायद्यामुळे बिल्डर लॉबीला लगाम घातला, हे मुद्देही रामनाथ कोविंद यांनी अधोरेखित केले आहेत.
नोटाबंदी एक महत्त्वपूर्ण निर्णय, जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढला- रामनाथ कोविंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:19 PM
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज संसदेत भाषण केलं.
ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज संसदेत भाषण केलं. सरकारनं सत्तेत आल्यानंतर नव्या भारताचा संकल्प केला आणि देशाला या अनिश्चिततेतून बाहेर काढलं.प्रत्येक गावात गॅस कनेक्शन, सर्वशिक्षा अभियान, सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकडे सरकारनं लक्ष्य दिलं