RamSetu: भारत आणि श्रीलंका, यांच्यादरम्यान असलेल्या 'रामसेतू'वर दोन्ही बाजूला भिंत बांधण्याची आणि सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हिंदू पर्सनल लॉ बोर्ड नावाच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक पांडे, यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. धनुषकोडीपासून समुद्रात 100 मीटरपर्यंत किंवा शक्य असल्यास एक किलोमीटरपर्यंत भिंत बांधण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.
दोन्ही बाजूंना भिंत कशी बांधता येईल?- सर्वोच्च न्यायालययाचिकेच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने विचारले की, दोन्ही बाजूला भिंत कशी बांधता येईल? त्यावर याचिकाकर्त्याने एका बाजु बांधावी, असे सांगितले. पण, अखेर सर्वोच्च न्यायालयाने ही जनहित याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, हा प्रशासकीय निर्णय आहे, न्यायालय भिंत बांधण्याच्या सूचना देऊ शकत नाही. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया, यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती.
पीआयएलला दुसऱ्या याचिकेसह टॅग करण्यास नकारसर्वोच्च न्यायालयाने या जनहित याचिकेसोबत आणखी एक याचिका टॅग करण्यासही नकार दिला. यामध्ये स्मारकाला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याचे निर्देश मागितले होते.