नवी दिल्ली : सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि आयटीबीपीच्या जवानांसाठी देशाच्या विविध भागांमध्ये १३०७२ घरे आणि ११३ बराकी बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दलांची कार्यक्षमता सुधारण्याचा एक भाग म्हणून ही घरे आणि बराकी बांधण्यात येणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक कामकाज कमिटीने बाराव्या पंचवार्षिक योजनाकाळात (२०१२-२०१७) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) दलाच्या देशभरातील ६८ ठिकाणी १३०७२ घरे आणि ११३ बराकी बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ही घरे व बराकी बांधण्यासाठी अंदाजे ३०९०.९८ कोटी रुपये खर्च येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जवानांसाठी घरे, बराकी बांधणार
By admin | Published: October 14, 2015 11:38 PM